situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025 : दारू विक्री प्रकरणी एकास अटक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोन ने एका व्यक्तीला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025) केली. ही कारवाई बुधवारी (18 जून) दुपारी नागसेननगर चिंचवड येथे करण्यात आली.

संदीप ज्यूजिस्टी खेमांडू (38, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोहेल चिखलकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर चिंचवड येथील नागसेननगर रेल्वे पटरी जवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संदीप याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7000 रुपये किमतीची 70 लिटर दारू जप्त केली आहे.

Jadhavwadi Lake : जाधववाडी तलाव ९४.५३% इतका भरल्याने इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025)

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (17 जून) रात्री खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे करण्यात आली.

दिलीप मधुकर शिंदे (25, बालाजीनगर, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे चाकण पोलिसांना एका कार मध्ये कोयते असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये दोन कोयते आढळून आले. पोलिसांनी कारचालक दिलीप शिंदे याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची कार आणि कोयते जप्त केले आहेत.


ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025)

पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (17 जून) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडला.

राहुल राजू लष्करे (20, आळंदी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सुनील लक्ष्मण लष्करे (40, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच 14/जीडी 8136) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल लष्करे हा भोसरी येथून मोशीच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. मोशीजवळ आल्यानंतर त्याच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात राहुल याचा मृत्यू झाला.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेतर्फे एक विद्यार्थी एक झाड उपक्रम


दुचाकीच्या धडकेत महिला जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025)

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला समोरून आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (17 जून) रात्री दहा वाजताच्या सुमारास आळंदी मरकळ रोड येथे घडला.

याप्रकरणी जखमी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालक अनिरुद्ध बाबाराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दुचाकीवरून जात होती. आळंदी मरकळ रोडवर वळण घेत असताना समोरून आलेल्या आरोपी दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून महिलेच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.


तरुणाला विनाकारण मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 19 June 2025)

रस्त्याने जात असलेल्या तरुणाला एकाने विनाकारण मारहाण केली. ही घटना सोमवारी (15 जून) सकाळी जुनी सांगवी येथे घडली.

शुभम प्रदीप गोयल (24, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित चलवादी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे जुनी सांगवी येथे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. पिंपळे गुरव येथे आरोपी अमित आणि शेखर तांबे यांचे भांडण चालू होते. त्यामुळे शुभम हे बाजूने जात होते. त्यावेळी आरोपी अमित याने शुभम यांना विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. लाकडी फळीने डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.

Follow Us On