Team MyPuneCity – जाधववाडी ल.पा. तलाव (Jadhavwadi Lake) ९४.५३ % भरल्याने आणि सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. द्वारविरहित असलेला हा तलाव १००% भरल्यास अनियंत्रित पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाने दिली आहे.
Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य
सद्यस्थितीत वाढता पाऊस आणि धरणातील पाण्याचा येवा यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, तसेच देहू, आळंदी ते तुळापूर या भागातील नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात साहित्य किंवा जनावरे असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य
विशेषतः देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांनी केले (Jadhavwadi Lake)आहे.