राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३७ माजी नगरसेवकांची घरवापसी
Team MyPuneCity – पिंपरी – विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे बाहेर पडत शरदचंद्र पवार पक्षात ( Pimpri -Chinchwad ) सहभागी झाले. आता त्यांनी घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ३७ माजी नगरसेवक आणि ३४ कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत दादांचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी अनेक माजी नगरसेवकांसोबत वेगळी भूमिका घेत तुतारी हाती घेतली. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराविरोधात त्यांनी रान उठवले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य
आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गव्हाणे यांनी पुन्हा दादांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केल्याने शहरात शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला ( Pimpri -Chinchwad ) आहे.