Team MyPuneCity – आज सकाळपासून आळंदीमध्ये( Alandi ) जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.यातच आळंदीत एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. मोठ्या पाण्याचा प्रवाह असल्याने तो जुन्या पुलाच्या पलीकडे वाहून गेल्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून आळंदीमध्ये जोरदार पाऊस असल्याने पुलावर पाणी आले आहे. त्रिवेणी भागीरथी कुंडाच्या दगडी घाटावरवरती पाणी आले आहे. तसेच भक्त पुंडलिक मंदिर पाण्यात असून तेथील परिसरात पाणी आहे.
Alandi : भर पावसातसुद्धा आळंदीत वारकरी दिंड्यांमध्ये भक्ती भाव व उत्साह
यातच आळंदीतील एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली . मोठ्या पाण्याचा प्रवाह असल्याने तो जुन्या पुलाच्या पलीकडे वाहून गेल्याची शक्यता आहे.
Bhandara Dongar : वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅगचे वाटप!
अधिक तपास पोलीस करत आहेत. नदी पात्रात पाण्याची वाढ होणार असल्याने सकाळीच मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी वारकरी भाविकांना नदीमध्ये न जाण्यासाठी ( Alandi ) आवाहन करण्यात आले.