Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा दि.१९ रोजी रात्री आठ वाजता होणार आहे. आळंदीमध्ये लाखो भाविकांचे आगमन झाले आहे. तसेच हरिनाम गजरात , माऊलींच्या जयघोषात वारकरी भाविकांच्या दिंड्याचे आगमन होत आहे. उद्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात फुलांच्या सजावटीची (Alandi) लगबग सुरू आहे.
मंदिरात गणेश मंदिर, सिद्धेश्वर महाराज मंदिर, अजाणवृक्ष परिसर, सुवर्ण पिंपळ, एकनाथ पार अश्या ठिकठिकाणी पुष्प माळा लावण्यात आल्या आहेत. तर काही फुलसजावटीचे कार्य बाकी असून त्यात कारागीर कार्य मग्न आहेत.


फुल सजावाटीत काही महिला पोलीससुद्धा आनंदाने कार्यभार व माऊलींची सेवा पार पाडत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनानंतर काही भाविक मंदिरात फुगड्या खेळत आहेत. हरिनाम गजर करत (Alandi) आहेत.