Team MyPuneCity – पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी (Anglo Urdu School) येथे असलेल्या नॅशनल अँग्लो उर्दू हायस्कूल या एकमेव अनुदानित उर्दू माध्यमिक शाळेचा कारभार भोंगळ असून, चुकीच्या व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत चालू शैक्षणिक वर्षात शाळा अद्याप सुरू न झाल्याची गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते अन्वर आर. सैय्यद यांनी संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
Devendra Fadnavis: फैसला ऑन दी स्पॉट : मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP Scheme रद्द
यासंदर्भात सैय्यद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह व शिक्षण विभाग अधिकारी बांगर यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये शाळेच्या व्यवस्थापन ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा शाळा वेळेत सुरू न झाल्याने १७ जून २०२५ रोजी सुद्धा विद्यार्थ्यांचा दुसरा दिवस वाया गेल्याचा (Anglo Urdu School) उल्लेख करण्यात आला आहे.
Shirgaon Crime News : शिरगाव येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
या शाळेला यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड महापालिकेने कर थकबाकीमुळे सील केले होते. त्या वेळी सैय्यद यांनी सामाजिक बांधिलकीतून आयुक्त व कर विभागाशी सातत्याने संवाद साधून शाळा पुन्हा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यावेळी सुद्धा त्याच ट्रस्टने शाळा वेळेवर न सुरू करता विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण केला आहे, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
सैय्यद यांनी शाळेसाठी जबाबदार व उच्चशिक्षित नवीन ट्रस्ट नेमण्याची मागणी केली आहे. तसेच सद्य:स्थितीत काम करणारे बेजबाबदार ट्रस्टी, शिक्षक, शिपाई, क्लार्क आणि इतर कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी जबाबदार कर्मचारी नियुक्त करण्याचीही विनंती केली आहे.
शाळा सुरू करण्याचे आदेश असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोषींवर कडक कारवाई करावी, अशी सैय्यद यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे या निवेदनातून स्पष्टपणे अधोरेखित (Anglo Urdu School) झाले आहे.