Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दि.१९ रोजी उद्या रात्री ८ वाजता होणार असून यानिमित्ताने लाखो भाविकांचे (Alandi) अलंकापुरीत आगमन झाले आहे. इंद्रायणी नदी काठ अनेक वारकरी भाविकांनी फुलून केला आहे.
Pune :पुण्यात शनिवारी वारकरी भक्तीयोग उपक्रमाचे आयोजन
आलेले वारकरी भाविक पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करत आहेत.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे हरिनाम गजरात, माऊलींच्या जयघोषात वारकरी भाविक दर्शन घेत आहेत.माऊलींचे दर्शन झाल्यावर वारकरी भाविकांच्या चेहऱ्यावर मनातून आनंदाचे व समाधान झालेले भाव दिसून येत आहेत.
फॅब्रिकेटेड पुलाचे काम पूर्ण झाले असून तेथून दर्शन बारीची सुविधा (Alandi) वारकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
फॅब्रिकेटेड पूर्ण होईल की नाही याकडे नागरिकांचे लक्ष होते.शहरात हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा माऊलीं तुकारामाच्या जयघोषात खांद्यावर पताका, वीणा, मृदुंगाचा नाद,टाळाचा लय बद्ध आवाज, महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन घेत वारकरी दिंडीचे आगमन होत (Alandi) आहे.
Rashi Bhavishya 18 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
कोणी हरिपाठ ,अभंग गात शहरातील रस्त्यांनी चालत आहेत.धर्मशाळा ,तंबू अश्या ठिक ठिकाणी हरी कीर्तन,प्रवचनाचे आयोजन केले आहे.शहरात अवघे भक्तिमय वातावरण झाले आहे.लहानांपासून ज्येष्ठापर्यंत या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.
वारकरी भाविकांसाठी ठिक ठिकाणी माऊलीं भक्त अन्नदान करताना दिसत आहेत.इंद्रायणी नदी काठी पोलीस कर्मचारी, पालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व एन डी आर आफ टीम सतर्क आहेत.तसेच मंदिर परिसरासह शहरात पोलिसांचा बंदोबस्त आहे.वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी वेळोवेळी सूचना स्पीकर द्वारे अनाऊसमेंट ची व्यवस्था करण्यात आली (Alandi) आहे.