Team MyPuneCity – नागपूर विमानतळामध्ये कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने अचानक इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्याने नागपुरात विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे विमानतळावर काही वेळ पळापळ आणि गोंधळ उडाला.
Alandi : अलंकापुरी वारकरी भाविक भक्तांनी फुलली
अधिक माहितीनुसार, नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले .विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे कॉल होता. त्यानंतर नागपुरात विमानाचे लँडिंग करवण्यात आले.
Bhat Sheti : सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले; मावळातील भात रोपवाटिका व पेरण्या अडचणीत
नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान अजूनपर्यंत काहीही धोकादायक वस्तू आढळलेली नाही.