Team MyPuneCity -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दि.१९ रोजी आहे.त्यानिमत्ताने अलंकापुरी भाविकांनी फुली लागली आहे. इंद्रायणी घाट भाविकांनी हळू हळू फुलू लागला आहे. वारकरी दिंड्याची काही वाहने आज पासून शहरात येताना दिसून येत आहे.तसेच काही एस टी ने भाविक दाखल होत आहेत.नदी पलीकडे आलेले भाविक चाकण रस्ता मार्गे, भक्ती सोपान पुल दर्शन बारी मार्गे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन मंदिराकडे येत आहेत.व माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत आहेत.
वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजली आहेत. तुळशीमाळा पखवाद, टाळ, संवादनी,वीणा , ज्ञानेश्वरी,गाथा,हरिपाठ,एकनाथी भागवत इ.वारकरी साहित्य वस्तूंची भाविक खरेदी करत आहेत.मंदिर परिसरातील हार ,फुले, प्रसादाची दुकानी सजली आहेत.इंद्रायणी घाटावर वासुदेव भाविकांकडून दान मागताना दिसून येत आहेत.पवित्र इंद्रायणी नदीच्या पात्रात भाविक स्नान करत आहेत.
Alandi: आळंदी ग्रामीण हद्दी परिसरात बिबट्याचा वावर


तसेच इंद्रायणी मातेची आरती,पूजा करत आहेत.आषाढी वारी निमित्ताने काही नागरिक त्यांच्या लहान मुलांना पारंपारिक वारकरी पोशाख परिधान करून इंद्रायणी घाटावर फोटो , व्हिडिओ शूटिंग करत होती.सिद्धबेट, विश्रांतवड, माऊलींची भिंत इ.ठिकाणी भाविक भेटी देऊन या पवित्र स्थळाचे दर्शन घेत होते.