situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीसोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Published On:
PMPML

Team MyPuneCity – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून( PMPML) दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे.

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक १६जूनपासून दिनांक २० जूनपर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण १४६ बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक १९जून रात्री १२:०० वा. पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Alandi : च-होली पुलावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे ठरत आहे रहदारीसाठी धोकादायक

याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण १४६ बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा २३ बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. २० जून रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे ०३:०० वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा १६ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली ( PMPML) आहे.


या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड
परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल.

Maval: मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान


तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक २२ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली ( PMPML) आहे.

तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तद्दनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.

हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.


तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ( PMPML) करण्यात येत आहे.

Follow Us On