Team MyPuneCity – आळंदी शहरात रस्त्याच्या खांबांवर लावलेले फ्लेक्स आणि बॅनर ही एक मोठी समस्या बनली आहे.अनेक ठिकाणी बेकायेशीररित्या फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला ही धोका निर्माण होतो.फ्लेक्स खांबांना बांधल्यामुळे ते वादळ व पावसामुळे खाली पडू शकतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
Pune : पुण्यात अजित पवारांचे भाषण प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थांबवल
आळंदी पालिका हद्दीत आळंदी पुणे रस्ता,चाकण पुणे रस्ता मार्ग या रस्त्यांवरील रस्त्या दुभाजका मधील रस्त्यांच्या दिव्यांच्या खांबावर फ्लेक्स लावलेले असून त्यातील काही दुरावस्थेत आहे. वादळी वारे पाऊस यामुळे काही अर्धवट अवस्थेत निसटलेले असून ते हवेने हलत आहेत. ते कधी रस्त्यावर पडतील याची खात्री नाही. तेथून रहदारी करणाऱ्या वाहनांसाठी ,नागरिकांसाठी ते धोकादायक आहे.
तसेच शहरात ठिक ठिकाणी रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबावर फ्लेक्स लावलेले आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने रस्त्यांवरील बेकायदेशीररित्या लावलेले फ्लेक्स व बॅनर काढणे आवश्यक आहे. तसेच शहरात आणखी कोठे बेकायदेशीररित्या होर्डींग आहेत का याची पालिकेने तपासणी करणे गरजेचे आहे.