Team MyPuneCity – शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक नवा अध्याय! हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरावा यासाठी ‘के एम टी इंटरनॅशनल स्कूल, काळेवाडी’ येथे यंदाचा प्रवेशोत्सव अतिशय आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार ( Kalewadi ) पडला.
सकाळच्या प्रसन्न हवेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुगे, फुलांची रांगोळी आणि खास तयार केलेल्या सेल्फी पॉईंटमुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता. अनेक पालक आपल्या पाल्यासोबत त्या क्षणांचा आनंद घेत सेल्फी काढत होते.
Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनाच्या या पहिल्या दिवशी चॉकलेट व केक देण्यात आले. शिक्षकवर्गाने प्रेमाने संवाद साधत मुलांना स्नेहाने ( Kalewadi ) मार्गदर्शन दिले. त्यामुळे वातावरण अधिक विश्वासार्ह आणि आनंददायी झाले.
‘के एम टी इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा साई मल्हार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली आहे. रहाटणी व काळेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अल्पशुल्क दरात उपलब्ध करून देणे, हा शाळेचा मुख्य उद्देश आहे. “शिक्षणाची सुरुवात जर प्रेरणादायी वातावरणात झाली, तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडते,” या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.
Kamshet Crime News : कामशेतमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणावर हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सध्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी व सीनिअर केजी यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिकाधिक पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेचे सचिव श्री विवेक तापकीर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका प्रियांका जाधव, वर्षा पाटील, साक्षी पाटील व शबाना सय्यद यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. सायली तापकीर यांनी सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाचे मन:पूर्वक आभार मानले.
या रंगतदार प्रवेशोत्सवाने के एम टी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षणाचा प्रवास एका सुंदर आणि संस्मरणीय क्षणाने सुरू झाला ( Kalewadi ) आहे.