situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: पालखी सोहळ्या सोबत फिरते भांडार गृह

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा १९ जून रोजी रात्री ८ वा.होणार आहे. दि.२० रोजी आजोळ घरातून पालखी आळंदीतून पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.यंदाचे पालखी सोहळ्याचे हे 194 वे वर्ष आहे.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी निमित्त लागणाऱ्या विविध वस्तू साहित्यांनी संस्थान चे भक्त निवास येथील भांडरगृह सज्ज झाले आहे.पालखी सोहळ्यात श्रींची लागणारे साहित्य, वस्तू , श्रींचा रथाला आवश्यक असणारे वस्तू साहित्य, पदाधिकारी, मानकरी,सेवकवर्ग ,कर्मचारी यांच्या साठी असणारे साहित्य वस्तू इ.तयारी विश्वस्तांच्या ,व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनातून श्रीधर सरनाईक,जगन्नाथ चिकणे, बाळासाहेब वाघमारे,गणेश रत्नपारखी,सुरेश वटाणे इ. भक्त निवास येथे करत आहेत.

आषाढी वारी निमित्ताने भक्त निवास मधील भांडारगृह विविध साहित्य वस्तूंनी भरले आहे.या मध्ये श्रींच्या अभिषेक पूजेसाठी, नैवेद्यासाठी आवश्यक साहित्य वस्तू ,देवस्थान कार्यालयीन साहित्य वस्तूंचा समावेश आहे.निवास व्यवस्था,भोजन व्यवस्थेसाठी आवश्यक असणारे साहित्य वस्तूंचा समावेश आहे.

पालखी सोहळ्यात स्वयंपाकासाठी लागणारी विविध भांडी,अन्न धान्य, (किराणा माल), तंबू,ताडपत्री,रेनकोट,अब्दागिरी ,शाली,पालखी वरील छत्र्या, नगरखाना ,स्टेशनरी साहित्य,दानपेट्या, पाट,चौरंग,वीज दिवे,बॅटऱ्या,मंडपासाठी लागणारे वस्तू साहित्य,गाद्या ,उश्या ,बेडशीट,कचरा व्यवस्थापन साठी लागणारे वस्तू साहित्य, प्रभावळ,पत्रावळ,बैलजोडी साठी लागणारे साहित्य ,देवस्थानचे फलक इ.समावेश आहे.श्रींच्या चांदीचे साहित्य वस्तूंचा समावेश असतो. तसेच भांडारगृहा मध्ये पालखी सोहळ्या निमित्त १० मानक-यांची पागोटी समावेश आहे.१)शिंदे सरकार,२)श्रीमंत शितोळे सरकार,३)कुऱ्हाडे पाटील चौरीवाले,४)मोझे, ५)नेर्लेकर, ६)बडवे(पंढरपूर), ७)चीतळकर पाटील, ८)दंडवते, ९)अनिल शि. घुंडरे पाटील,१०)कुऱ्हाडे पाटील आरती मानकरी. यांना प्रस्थान सोहळ्या दिवशी संस्थांच्या वतीने ती बांधली जातात.

पालखी सोहळ्यातील देवस्थानच्या वस्तू साहित्य इतर बाबींसाठी नोंदवही समावेश आहे.तसेच या नोंद वहीत रथाची माहिती लिहिण्यात आली आहे श्रींच्या रथाची उंची १३ फूट, लांबी१४फूट ,रुंदी६ फूट ,मधील भाग१२ फूट,रथाच्या आतील बाजू ५फूट. या बाबतची नोंद केली आहे.

आळंदी ते पंढरपूर किमी. प्रवास दर्शवणारा तक्त्याचा समावेश आहे.यामध्ये आळंदी ते पुणे २९किमी,पुणे ते सासवड३२ किमी,सासवड ते जेजुरी १६ किमी,जेजुरी ते वाल्हे १३ किमी,वाल्हे ते लोणंद २० किमी, लोणंद ते तरडगाव ८ किमी,तरडगाव ते फलटण २१ किमी, फलटण ते बरड १८ किमी,बरड ते नातेपुते २१किमी, नातेपुते ते माळशिरस,१८ किमी,माळशिरस ते वेळापूर १९किमी,वेळापूर ते भंडीशेगाव २१किमी,भंडीशेगाव ते वाखरी १० किमी,वाखरी ते पंढरपूर ९किमी एकूण किमी २५५.

आषाढीवारी निमित्त देवस्थान व प्रशासनाची लगबग

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा १९ जून ला होणार आहे. त्या निमित्ताने भाविकांसाठी नदीपलीकडे वैतागे मंदिरा शेजारील जागेत दर्शन बारी मंडपाचे काम सुरू आहे. मंदिर परिसरात दर्शनबारी व्यवस्थेचे कार्य सुरू आहे.श्रींच्या रथाला बैल जोड जुंपून सराव चाचणी घेण्यात आली आहे.
शहरात ठीक ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारत आहेत.प्रशासनाच्या वतीने ठीक ठिकाणीं फिरते शौचालय ठेवण्यात येत आहेत.

Dehu : देहूफाटा-येलवाडी रस्त्याची दुरुस्ती पालखीपूर्वी न झाल्यास बेमुदत उपोषण

Follow Us On