Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १५, शके १९४७. वार – बुधवार. तारीख – ११.०६.२०२५ (Rashi Bhavishya 11 June 2025). शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – ज्येष्ठा २०.११ पर्यंत नंतर मूळ. चंद्र राशी – वृश्चिक २०.११ पर्यंत नंतर धनु.
मेष- (शुभ रंग- मोरपिशी) Rashi Bhavishya 11 June 2025
कार्यक्षेत्रात तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडतील व तुम्हाला नैराश्य येईल. आज नोकरीत वरिष्ठांशी जरा नमते घ्या. संध्याकाळी वाहन सावकाश चालवा.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
उद्योग व्यवसायात काही आव्हान देणारे प्रसंग सोडवावे लागतील. भागीदारी व्यवसायात देणे-घेणे लिखित स्वरूपात ठेवा. वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण असेल.
मिथुन (शुभ रंग – पांढरा)
अतिमहत्त्वाकांक्षांना थोडा आवर घालून आज आपल्या तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची नक्कीच दखल घेतील.
कर्क ( शुभ रंग- मोतिया)
उच्चशिक्षित असणाऱ्यांना लठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी चालून येतील. नवविवाहित दांपत्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. छान दिवस.
सिंह ( शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 11 June 2025
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या आनंदाने पुरवाल.
कन्या (शुभ रंग- भगवा)
विविध मार्गाने येणारा पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयार असतील. काहीजण एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालतील. शेजारी आपलेपणा वाढेल.
तूळ (शुभ रंग- निळा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थिती ही उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा गोड बोलूनच नाती जोडता येतील.
वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही जरासे हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे तुम्हाला अवघड जाईल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. जोडीदाराच्या भावना जपायला हव्यात.
PCMC : गुरुवारी पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 11 June 2025
राशीच्या कर्म स्थानातून भ्रमण करणारा चंद्र ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न वाढवायला सांगत आहे. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे राहील. अधिकारांचा गैरवापर करू नये.
मकर (शुभ रंग- तांबडा)
आज खर्च कितीही वाढला तरी लाभातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. मित्र व नातलग तुमच्या शब्दाला मान देतील.
कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
तुमची मोठ्या लोकांमधील असलेली उठबस तुमच्या व्यवसायवृद्धीच्या कामी येईल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.
मीन (शुभ रंग – डाळिंबी)
आज काही जणांचा गूढ शास्त्राकडे ओढा राहील. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल. सज्जनांच्या सहवासात तुमचेही विचार प्रगल्भ होतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424