विद्यमान ग्राहकांसाठी मोफत व्हेईकल तपासणी आणि आकर्षक फायदे
Team MyPuneCity – सर्वोत्तम मालकीहक्क अनुभव देण्याप्रती सातत्यपूर्ण कटिबद्धतेसह टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या (Tata Motors)ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने ग्राहकांसाठी देशभरात मान्सून चेक-अप कॅम्पच्या शुभारंभाची घोषणा केली. ५०० शहरांमध्ये राबवण्यात येणारा आणि १,०९० हून अधिक अधिकृत वर्कशॉप्सच्या पाठबळासह हा व्यापक सर्विस उपक्रम ६ जून ते २० जून २०२५ पर्यंत राबवण्यात येईल.
Mahalunge Crime News : मारहाण करत कामगारांना लुटणाऱ्या तिघांवर गुन्हा
पावसाळा सुरू होत असताना या उपक्रमाद्वारे ओलसर व आव्हानात्मक ड्रायव्हिंग स्थितींमध्ये अनुकूल व्हेईकल कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची खात्री होईल. ग्राहक मोफत सर्वसमावेशक वेईकल हेल्थ
तपासणीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये आवश्यक सिस्टम्सना कव्हर करणारे तीसहून अधिक महत्त्वपूर्ण
तपासणी मुद्दे आणि ईव्ही-विशिष्ट डायग्नोस्टिक्सचा समावेश आहे. या शिबिरात कार टॉप वॉश आणि
ओरिजिनल स्पेअर पार्ट्स, इंजिन ऑईल, अॅक्सेसरीज, विस्तारित वॉरंटी व लेबर चार्जवर (कामगार शुल्क) विशेष सूट देण्यात येणार (Tata Motors)आहे.
आणखी आनंदाची बातमी म्हणजे ग्राहक नवीन टाटा कार्सवर आकर्षक एक्स्चेंज ऑफर्स, तसेच त्यांच्या विद्यमान व्हेईकल्सच्या मोफत तपासणीचा लाभ घेऊ शकतात. टाटा मोटर्स मूल्य-केंद्रित सर्विस अनुभव देत ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक दृढ करत आहे, जेथे सुरक्षितता, विश्वास आणि सोयीसुविधेला प्राधान्य दिले जाते. ग्राहकांना मान्सून चेक-अप कॅम्पचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स वर्कशॉपला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० २०९ ८२८२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा
customercare@tatamotors.com येथे ईमेल करू (Tata Motors) शकतात.