Team MyPuneCity – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०२५ सालचे पुरस्कार जाहीर करताच तळेगाव दाभाडेकरांसाठी अभिमानाचा क्षण उजाडला ( Talegaon Dabhade) आहे. या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीत रंगकर्मी, साप्ताहिक ‘अंबर’चे संपादक आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त पं. सुरेशराव साखवळकर यांची निवड झाली आहे. तर बालरंगभूमीतील अमूल्य योगदानाबद्दल डॉ. मीनल दिनेश कुलकर्णी यांना कालिंदी केळुस्कर पुरस्कृत ‘अ. सी. केळुस्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
Kalyan Jewellers : अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या पुण्यातील चौथ्या शोरूमचे उद्घाटन
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, यशवंत नाट्यगृह, माटुंगा (दादर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, नाट्य परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, तसेच नाट्य परिषदेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संगीत रंगभूमीवरील अर्धशतकाचा सातत्यपूर्ण आणि सजग प्रवास – सुरेश साखवळकर
पं. सुरेशराव साखवळकर यांनी गेली पाच दशके संगीत नाट्याच्या क्षेत्रात अविरत कार्य करत मराठी रंगभूमीचा झेंडा उंचावला आहे. त्यांनी साकारलेली संगीत भूमिका, गायकीतील प्रावीण्य, रंगभूमीवरील निष्ठा आणि कार्यकर्तृत्व यामुळे रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. ते पुण्याच्या बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष असून, संगीत रंगभूमीशी त्यांचे नाते आत्मीयतेचे आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत नाट्य परिषदेने त्यांना यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
बालनाट्य चळवळीच्या आधारस्तंभ – डॉ. मीनल कुलकर्णी
डॉ. मीनल कुलकर्णी या तळेगावमधील नामवंत नृत्य अभ्यासिका, ‘सृजन नृत्यालय’ या संस्थेच्या संस्थापक आणि ‘कलापिनी तळेगाव’च्या नाट्य विभाग प्रमुख आहेत. त्यांनी ‘अमृत संजीवनी’ आणि ‘भाग्ये देखिला तुका’ यांसारख्या नृत्यनाट्यांचे लेखन-दिग्दर्शन केले असून, गेली २५ वर्षे बालरंगभूमीसाठी शिबिरे, कार्यशाळा, प्रयोग यांचे आयोजन करत पुढील पिढीला घडवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘अ. सी. केळुस्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
स्थानिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
या सन्मानाने तळेगाव शहरात उत्साहाचे वातावरण असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखा अध्यक्ष सुरेश धोत्रे, संचालक मंडळ, कलापिनी तळेगाव संस्था आणि शहरातील अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दोघांच्याही कार्याचा गौरव करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या कार्यामुळे तळेगावच्या सांस्कृतिक ओळखीला राज्यपातळीवर नवा सन्मान लाभला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार सजावट
पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘गोविंदायन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात ‘संगीत शारदा’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मृच्छकटिक’ या नाटकांतील निवडक दृश्यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर यांसारखे कलाकार सहभागी ( Talegaon Dabhade) होणार आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार विजेत्यांची यादी
जीवनगौरव पुरस्कार
सुरेश साखवळकर – ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेते
नीना कुलकर्णी – ज्येष्ठ अभिनेत्री
अ. सी. केळुस्कर पुरस्कार
डॉ. मीनल कुलकर्णी – बालनाट्य क्षेत्रातील योगदानासाठी
व्यावसायिक नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट लेखक – सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (उर्मिलायन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अद्वैत दादरकर (शिकायला गेलो एक)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – प्रदीप मुळ्ये (असेन मी नसेन मी)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – शीतल तळपदे (मास्टर माइंड)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निषाद गोलांबरे (वरवरचे वधुवर)
सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार – राजेश परब (गोष्ट संयुक्त मानापमानाची)
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – असेन मी नसेन मी (संस्था – स्क्रीप्टज क्रिएशन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुव्रत जोशी (वरवरचे वधुवर)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – प्रशांत दामले (शिकायला गेलो एक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – हृषिकेश शेलार (शिकायला गेलो एक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नीना कुलकर्णी (असेन मी नसेन मी)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – शर्मिला शिंदे (ज्याची त्याची लव्ह स्टोरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शुभांगी गोखले (असेन मी नसेन मी)
अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार – निहारिका राजदत्त (उर्मिलायन)
प्रायोगिक नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक – संगीत आनंदमठ (संस्था – कल्पक ग्रुप, पुणे)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – मिडिया (संस्था – रुद्रेश्वर, गोवा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मुकुल ढेकळे (Moon Without Sky)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – यशवंत चोपडे (ब्लँक इक्वेशन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पूनम सरोदे (वेटलॉस)
सर्वोत्कृष्ट गायक – अभिषेक काळे (संगीत अतृप्ता)
सर्वोत्कृष्ट गायिका – अनुष्का आपटे (संगीत आनंदमठ)
सर्वोत्कृष्ट लेखक – डॉ. सोमनाथ सोनवळकर (The Feeling Paradox)
बालरंगभूमी
बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी – डॉ. मीनल कुलकर्णी
विशेष पुरस्कार / इतर सन्मान
युवा नाट्य पुरस्कार – सुशांत शेलार ( Talegaon Dabhade)
नाट्य परिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कार – महेश कापडोसकर
नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार – सागर मेहेत्रे
सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार – विक्रांत शिंदे
सर्वोत्कृष्ट निवेदक – संतोष लिंबोरे (पाटील)
गुणी रंगमंच कामगार – सतीश काळबांडे
नाट्य समीक्षक पुरस्कार – अनिल पुरी
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था – विजय नाट्य मंदिर, नाशिक
सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक – अजय कासुर्डे
रंगभूमी व्यतिरिक्त विधायक कार्यासाठी – विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले
सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे
कामगार रंगभूमीवरील सर्वोत्तम लेखक पुरस्कार – डॉ. चंद्रकांत शिंदे ( Talegaon Dabhade)