situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML : पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ चा शुभारंभ

Published On:
PMPML

Team MyPuneCity – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पर्यटन बससेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रविवार दि. ८ जून २०२५ रोजी सकाळी ९ वा. पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ चा शुभारंभ परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते बसेसना हिरवा झेंडा दाखवून ( PMPML) करण्यात आला. तसेच पर्यटन बससेवा क्र. ६ साठी देखील एक बस मार्गस्थ झाली.

याप्रसंगी पीएमपीएमएल चे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, प्र.कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, पास विभाग प्रमुख विकास मते, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर शैलेश जगताप, चऱ्होली डेपो मॅनेजर राजेश जाधव, भेकराईनगर डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे, न.ता.वाडी प्र. डेपो मॅनेजर राजकुमार माने, अप्पर प्र. डेपो मॅनेजर सचिन वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पीएमपीएमएल च्या डेक्कन बसस्थानक येथून पर्यटन बससेवा क्र. ६ साठी १ बस तसेच पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ साठी प्रत्येकी २ बसेस अशा एकूण ५ बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. या तिन्ही पर्यटन बससेवेसाठी एकूण १५१ पर्यटकांनी बुकिंग केले हाते. यामध्ये महिला पर्यटकांची ( PMPML) संख्या लक्षणीय होती.

Chakan Crime News : पोलिसांत तक्रार केल्याने महिलेचे अपहरण करून केला अत्याचार ; सात जणांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल

यावेळी बोलताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या, पीएमपीएमएल च्या पर्यटन बससेवेला महिला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या किफायतशीर पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी ( PMPML) घ्यावा.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता एकूण १० पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून पर्यावरणपूरक व वातानुकूलित ई बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बससेवा’ सुरू आहे. यापूर्वी प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा उपलब्ध होती. मात्र आता आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस पर्यटन बससेवा उपलब्ध असणार आहे. या पर्यटन बससेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो.

  • पर्यटन बससेवा क्र. ६  ( PMPML)
  • मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.
  • पर्यटन बससेवा क्र. ८
  • मार्ग – पुणे स्टेशन – स्वारगेट – इस्कॉन मंदिर रावेत – मोरया गोसावी मंदिर चिंचवड – प्रतिशिर्डी शिरगांव – देहुगांव गाथा मंदिर – भंडारा डोंगर पायथा – स्वारगेट- पुणे स्टेशन. 
  • पर्यटन बससेवा क्र. ९
  • मार्ग – स्वारगेट – पौडगांव – श्री सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान) – चिन्मय विभूतीयोग साधना ध्यानकेंद्र कोळवण – स्वारगेट.

पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे

  1. बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांचे बुकिंग मोफत.
  2. सर्व पर्यटन बससेवांसाठी दर प्रति व्यक्ती प्रति मार्गाकरीता रू. ५००/- इतका आहे.
  3. पर्यटन बससेवेकरीता बुकिंग – १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर  गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवरून करता येते.
  4. यापूर्वी प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा उपलब्ध होती. मात्र आता आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस पर्यटन बससेवा उपलब्ध असणार ( PMPML) आहे.
  5. सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी प्रवास करण्याची मुभा राहील.
  6. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
  7. प्रवाशांना माहिती देण्याकरीता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवक.
  8. पर्यटन बससेवेचे तिकिट बुकिंग व स्थळांसंदर्भातील माहिती करीता पीएमपीएमएल चे समन्वयक सेवक श्री. नितीन गुरव मो.क्र. ९८५०५०१८६२ यांचेशी संपर्क ( PMPML) साधावा.

Follow Us On