Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १३, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ०९.०६.२०२५ (Rashi Bhavishya 9 June 2025). शुभाशुभ विचार – १६ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – विशाखा १५.३१ पर्यंत नंतर अनुराधा. चंद्र राशी – तूळ ०८.५१ पर्यंत नंतर वृश्चिक.
मेष- (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 9 June 2025
आज कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या आर्थिक उलाढाली करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवणे विषयी चर्चा उद्यावर ढकला. प्रतिकूल दिवस.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पळाल.
मिथुन (शुभ रंग – लाल)
किरकोळ वाटणारी दुखणी ही दुर्लक्षित करू नका. राशीच्या षष्ठातून चंद्र भ्रमण होत असल्याने काही जुने आजार डोके वर काढतील. काळजी घ्यायला हवी.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
काहीजण थोडा वेळ काम बाजूला ठेवूनही आपल्या जुन्या छंदासाठी वेळ काढतील. आज संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल.
Vadgaon Maval: राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 9 June 2025
आज राशीच्या चतुर्थस्थानात चंद्रभ्रमण होत असताना गृहिणी अतिव्यस्त असतील. आज मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात डोकावून पाहणे हिताचे राहील.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात काही नवे हितसंबंध तयार होतील. तरी आज नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार मात्र टाळा. आज जरा आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ (शुभ रंग- भगवा)
आज खर्च करताना काळजी करू नका. राशीच्या धनस्थानातील चंद्र जमा खर्चाचा तराजू समतोल ठेवेल. कठोर बोलून आपल्या हितचिंतकांना दुखावू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- तांबडा)
आज मनाच्या लहरीपणावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अनुभवींचे मार्गदर्शन घेणे हिताचे राहील. आज स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.
धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 9 June 2025
बेरोजगारांना घरापासून लांब रोजगार मिळेल. पासपोर्ट विजा संबंधित कामे यशस्वी होतील. रात्रीच्या प्रवासात सावध राहा. मौल्यवान ऐवज जपा.
मकर (शुभ रंग- निळा)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.
मीन ( शुभ रंग – )
नोकरदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. जेष्ठ मंडळींनी आज सल्ले न देता सत्संगात रमावे. आज सरकारी नियम मोडल्याने दंड भरावा लागू शकतो.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424