situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 07 June 2025 : पूर्ववैमनस्यातून चौघांवर कोयता, चाकूने हल्ला

Published On:

Team MyPuneCity – जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून चौघांवर कोयता, चाकू, लाकडाने हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (६ जून) रात्री संत तुकाराम नगर येथे घडली.

अरमान अजीज सय्यद (२२, संत तुकाराम नगर, पिंपरी), यासिन सादिक सय्यद, साद अश्फाक शेख, अथर्व उर्फ मोन्या गंधुरे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी अरमान यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसीम शाबीर सय्यद (२६), जावेद शाबीर सय्यद (२७), रोहित कसबे (२७), फरमान सैफी (२४, पिंपरी), लाला पठाण (३०, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरमान हे त्यांच्या मित्रांसोबत टेबल गेम खेळण्यासाठी एच ए कंपनी कॅम्पस मधील वेल्फेअर सेंटर मध्ये गेले होते. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अरमान आणि त्यांच्या तीन मित्रांना कोयता, चाकू, लाकडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी जावेद सय्यद, फरमान सैफी या दोघांना अटक केली आहे.


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून ५२ लाखांची फसवणूक

मोशी येथील एका व्यक्तीला अनोळखी व्यक्तींनी फोन केला. फोनवरील व्यक्तींनी ते मुंबई क्राईम ब्रांच आणि फायनान्स विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून व्यक्तीच्या खात्यात असलेल्या पैशांबाबत मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचे सांगत त्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ५२ लाखांची फसवणूक केली. ही घटना २ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संताजी घोरपडे, जॉर्ज मॅथ्यू नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील पीडित व्यक्तीला अनोळखी क्रमांकावर फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो मुंबई क्राईम ब्रांच मधून संताजी घोरपडे आणि फायनान्स विभाग प्रमुख जॉर्ज मॅथ्यू असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या बँक खात्यात असलेल्या पैशांबाबत मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. बँक खात्यातील रकमेची फायनान्स विभागाकडून पडताळणी करून ती परत फिर्यादी यांच्या खात्यात भरण्यात येईल, असे सांगून फिर्यादीकडून ५२ लाख ५९ लाख रुपये घेतले. त्यानंतर ते पैसे पुन्हा फिर्यादी यांच्या बँक खात्यात न भरता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.


लहान भावाला मारहाण प्रकरणी मोठ्या भावावर गुन्हा दाखल

घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (६ जून) चिंचवड येथील इंदिरा नगर झोपडपट्टी येथे घडली. हनुमंत सुभाष करडे (२८) असे मारहाण झालेल्या लहान भावाचे नाव आहे.

त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सुभाष करडे (४२) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत हे त्यांच्या मोठ्या भावाकडे घरगुती कारणावरून झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेले होते.त यावेळी सचिन आणि दोन महिलांनी हनुमंत यांना लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारून जखमी केले.


पुणे-मुंबई महामार्गावर बसची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे परिसरात एका बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला. हा अपघात शनिवारी (७ जून) सकाळी घडला.

निंगाम्मा बंडाप्पा बिराजदार (३६, दापोडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल पिरोजीराव पवार (४५, दापोडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पवार आणि महिला निंगाम्मा हे दोघे दापोडी येथून तळेगाव दाभाडे येथे दुचाकीवरून जात होते. तळेगाव दाभाडे परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर एका बसने पवार यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात निंगाम्मा या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर पवार हे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेला आहे.


पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (६ जून) रात्री माण येथे करण्यात आली. गणेश सुनील मोरे (३३, भूगाव, मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कपिलेश इगवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माण – म्हाळुंगे रोडवर एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून गणेश मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५१ हजार रुएए किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

Follow Us On