Team MyPuneCity – आळंदी पुणे रस्त्यावर देहू फाटा चौक येथे रस्त्यावरच विद्युतपोल असल्याने तेथून वाहनांना वाहतूक करताना कायम स्वरूपी समस्या निर्माण होत होती.
अनेक वर्षांपासून ती समस्या कायम होती.वारंवार तेथील विद्युत पोल काढण्याची मागणी नगरपालिकडे होत होती.आषाढी वारी बैठकीत या समस्ये कडे आधिकऱ्यांचे लक्ष वेधले होते. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी बैठकीत सांगितले होते. ती समस्या सोडवली जाईल.आज दि.७ रोजी आषाढी वारी पूर्वी सदर चे विद्युत पोल काढण्यात आले असून नवीन पोल शिफ्टिंग चे काम करण्यात आले.
Pune Crime News 06 June 2025 : स्वारगेट परिसरात घरफोडी; सोन्याचे दागिने चोरीला
हे कार्य विद्युत वितरणाच्या सहकार्याने करण्यात आले.देहूफाटा रस्त्यावरील वाहनांच्या वाहतूकी साठी अडथळा निर्माण होणारी ती समस्या सुटल्याने त्याबद्दल आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
