Team MyPuneCity – स्वारगेट भागात ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० ते ६ जून सकाळी १०:३० या दरम्यान एका घरात चोरीची घटना घडली आहे.
फिर्यादी वय ६३ वर्षे, राहणार स्वारगेट पुणे, यांनी सांगितले की त्यांचा राहता फ्लॅट कुलुप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा कुलुप उचकटून घरात प्रवेश केला. या घरातील बेडरूममधील कपाटातून ३,८५०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे-हिर्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील या या प्रकरणी तपास करत आहेत.
कोंढव्यात हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटमधून रोख रक्कम चोरी
कोंढवा भागातील खडी मशीन चौकाजवळील कुल उत्सव हाऊसिंग सोसायटीत ३१ मे ते ५ जून दरम्यान एका फ्लॅटमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी वय ३३ वर्षे, रा. पर्वती दर्शन पुणे, यांनी सांगितले की त्यांच्या राहत्या फ्लॅटचे कुलुप बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा कुलुप उचकटून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातून ५२,०००/- रुपये रोख व सोबतच साक्षीदार महिलांच्या फ्लॅटमधील लोखंडी कपाटातून २५,०००/- रुपये रोख असा एकूण ७७,०००/- रुपये रोख चोरीला गेले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ऑनलाईन शेअर मार्केट फसवणूक; ३८ लाखांहून अधिक रुपये लोप
मोहम्मदवाडी भागातील एका व्यक्तीवर ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी वय ५६ वर्षे, राहणार मोहम्मदवाडी, यांनी तक्रार दिली की मोबाइल व लिंक धारकांनी त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास मिळविला. मात्र, त्यानंतर ३८,१०,०००/- रुपये फसवणुकीने लोप झाले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
रस्तापेठ परिसरात एटीएम फसवणूक; खात्यातून पैसे चोरी
सोमवार पेठ भागातील राज रेस्टॉरंटसमोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या जवळ ५ जून २०२५ रोजी रात्री ८:०५ वाजता एटीएम फसवणुकीची घटना घडली.
फिर्यादी वय ७४ वर्षे, रा. सोमवार पेठ, पैसे काढण्यासाठी गेले असताना, अज्ञात व्यक्तीने एटीएम मशीनमध्ये पैसे बाहेर येण्याच्या पट्टी लावून त्यांची नजर चुकवली. या फसवणुकीतून १,०००/- रुपये चोरीला गेले.
पोलीस फौजदार पागार ह्यांच्या देखरेखीखाली तपास सुरु आहे.