Team MyPuneCity – मावळ तालुक्यातील डोंगरगाव येथील जमीन गट क्रमांक ४२ मधील एका रूमचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला आहे. या घरफोडीत ३,५०,८००/- रुपये किंमतीचे क्रन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य चोरीला गेले आहे.
फिर्यादी दिलीप शामराव दामोदरे (वय ६१, व्यवसाय क्रन्स्ट्रक्शन, रा. नवसन मित्र कॉ. हौसिंग सोसा, घर नं. ३४ बी, नांगरगाव, स्वामी समर्थ मठाजवळ, लोणावळा, मावळ, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २०२४ ते २६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अज्ञात आरोपींनी हा चोरीचा प्रकार केला.
सदर चोरी आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून, पोलीस स्टेशन मावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.