Team MyPuneCity – भरधाव वेगातील कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील एक युवक जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ बळीराम अक्कलवाड (वय १९, रा. देहूगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता ते आपल्या भाऊ सुदाम अक्कलवाड व मित्र ज्ञानेश्वर अक्कलवाड यांच्यासोबत दुचाकी (क्र. एम एच २६ सीएच ७४६५) वरून चाकण-तळेगाव रोडने जात होते.
यावेळी गेल पेट्रोल पंपाजवळ अज्ञात पांढऱ्या कंटेनर ट्रक चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ज्ञानेश्वर अक्कलवाड (वय २०) यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर फिर्यादी एकनाथ आणि त्यांचे भाऊ सुदाम गंभीर जखमी झाले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस आरोपी कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत. तपास सपोनि गुमाणे करीत आहेत.