Team MyPuneCity –श्रीमाऊलींचे कृपाप्रसादाने पाच वर्षापूर्वी ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवार स्थापन झाला. श्रीज्ञानदेवांच्या साहित्याचा वापर किंवा उपयोग हा विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षणाकरिता सुरु करावा ह्या विचाराने श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथे ४ थी, ५ वी, ६ वी साठी श्रीहरिपाठ सुरु करून झाला. त्याच बरोबर इयत्ता आठवीसाठी श्रीज्ञानेश्वरी मधील विद्यार्थ्यांचे संस्कार व मूल्यशिक्षणाचे विषय शिकवावयास सुरुवात झाली. त्याचे श्रेय श्रीज्ञानेश्वर विद्यालयास देत असताना आळंदी मधील ह. भ. प. डॉ सुभाष महाराज गेठे, भागवत साळुंखे, वासुदेव शेवाळे, उमेश बागडे यांनी पाच वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात सर्वत्र व्हावा यासाठी माऊलीं मंदिरात तत्कालीन विश्वस्त,श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात अध्यापन देत असलेले अध्यापक व इतर मान्यवर यांच्यात बैठक झाली.हा उपक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या देवस्थान सहकार्य करेल असे सांगण्यात आले.तद्नंतर प्रसार माध्यमातून ते प्रसारित करण्यात आले.व या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तयार असणाऱ्या संस्था,शाळा यांची बैठक भक्त निवास मध्ये आयोजित करण्यात आली होती.
तिथे आळंदी पंचक्रोशी व इतर शाळे ,संस्थे मधील प्रतिनिधीनी या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले.व आळंदी पंचक्रोशी सह, पुणे जिल्हा व जळगांव पर्यंत ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम ९० शाळेपर्यंत पोहोचला.
देवस्थान तत्कालीन विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी देवस्थान तर्फे या उपक्रमास सर्व साहित्य दिले.पंचक्रोशी, पुणे जिल्हा व जळगांव पर्यंत ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम ९० शाळेपर्यंत पोहोचला.
देवस्थानने साहित्याबरोबर ज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण व संस्कारांचे धडे हे पुस्तक निर्माण करून भाषा मंत्री उदयजी सामंत यांचे हस्ते प्रकाशन केले. ओळख श्रीज्ञानेश्वरी हे पुस्तक आदरणीय डॉ. गेठे, मा. भागवत साळुंखे, मा. शेवाळे ह्यांचे लेखणीमधून तयार झाले. त्याचबरोबर माजी विश्वस्त अभय टिळक यांनी अध्यापकांसाठीही एक पुस्तक लिहिले. २४ मार्च अखेर ९० शाळांमध्ये इयता ५, ६ साठी हरिपाठ पाठांतर, इयत्ता ७ वी साठी हरिपाठाचा अर्थ व इयत्ता आठवीसाठी ओळख ज्ञानेश्वरी मूल्यशिक्षण व संस्कार शिक्षण चालू आहे.
PCMC: चऱ्होलीकरांचा 9 जूनला महापालिकेवर मोर्चा
शिक्षण संस्थांना वेगळा वेळ न देता त्यांच्या कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमास धक्का न लावता व्यवस्था व व्यवस्थापन हा शिक्षकांचा कोणताही जास्त वेळ न घेता ऑफ पिरियड तासामध्ये शिक्षक गैरहजर असताना श्रीहरिपाठ व दर शनिवारी आनंददायी ओळख ज्ञानेश्वरी असा उपक्रम चालू आहे. हे होत असताना अनेक शाळांनी आपल्याच शिक्षकांमार्फत हा उपक्रम राबविण्यासाठी पाऊल उचले. त्याचा परिणाम माऊली संस्थान परिवाराने शाळेमधील शिक्षकांना हा उपक्रम व्यवस्थित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. सदर कार्यशाळा आळंदीत सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी श्रीज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची येथे होणार आहे.
त्याचबरोबर हा उपक्रम जूनपासून पैठण, नाशिक, नेवासा इथून सुरू व्हावा अशी शालेय संस्थांची मागणी होत आहे.
श्रीज्ञानेश्वरीमधील प्रगल्भ ज्ञानास स्पर्श न करता अभ्यास कसा करावा, श्रवण कसे करावे, बोलावे कसे, आईवडील व गुरुजनांविषयी माऊलींचे विचार व श्रीज्ञानेश्वरीमधील ज्ञान व विज्ञान संगत तसेच समाजशास्त्र, नागरिक शास्त्र इ. शाखांचे माऊलींचे विचार विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणा बरोबर देण्यासाठी ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवार प्रयत्नशील आहे.
हा उपक्रम शाळांनी चालू करावा, कार्यशाळेसाठी शिक्षकांनी सहभागी व्हावे यासाठी सहकार्य करावे.असे यावेळी प्रकाश काळे म्हणाले.यावेळी अजित वडगांवकर,अर्जुन मेदनकर उपस्थित होते.