Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गावाच्या हद्दीत दरड (Lohgad Landslide) कोसळल्याची घटना शनिवारी (७ जून) सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व बाजूस लोहगड गाव वसलेले असून, तेथील लोकसंख्या ६५० पेक्षा अधिक आहे. तर किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गाव आहे. मागील पंधरा दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले असून, त्याचा परिणाम म्हणून भाजे गावाच्या बाजूला किल्ल्याच्या उतारावर असलेला काही भाग शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोसळला (Lohgad Landslide). दरड कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने ही माहिती महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली.
Chenab Bridge: चिनाब पूलाच्या निर्मितीमुळे पाकिस्तानसह चीन चिंतेच्या गर्द खाईत; तर भारतीय लष्कराला होतोय मोठा फायदा, नेमकं कारण काय?

घटनेनंतर महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सध्या या ठिकाणी कोणतीही धोका निर्माण झालेला नसला, तरी पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया :
विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ, यांनी सांगितले, “लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गावाच्या हद्दीत दरड (Lohgad Landslide) कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, अशी सूचना आम्ही स्थानिकांना दिली आहे.”
PCMC: चऱ्होलीकरांचा 9 जूनला महापालिकेवर मोर्चा