महिलांतील वादातून हिंसाचार (Khed Murder)
Team MyPuneCity — बहुळ (ता. खेड) गावात महिलांतील किरकोळ वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन तुफानी हिंसाचारात झाले. एका पुतण्याने आपल्या चुलत्याचा लोखंडी गज घुसवून खून (Khed Murder) केला, तर चुलत भावाला गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत दत्तात्रय पानसरे (वय ६२, रा. चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ) यांचा मृत्यू (Khed Murder) झाला असून, त्यांचा मुलगा तुकाराम दत्तात्रय पानसरे (वय ३८) गंभीर जखमी झाले आहेत. तुकाराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुलतभाऊ दशरथ गुलाब पानसरे (रा. चांदणी चौक, बहुळ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
वादातून हिंसाचारापर्यंत
शुक्रवारी सकाळी तुकाराम पानसरे यांची पत्नी आणि दशरथ पानसरे यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, सणसवाडीत कंपनीत कामावर असलेल्या दशरथ याला त्याच्या पत्नीने फोन करून घरी बोलावले. घाईघाईने दुचाकीवरून घरी परतलेल्या दशरथने हातात लोखंडी गज घेतला आणि तुकाराम यांच्यावर थेट हल्ला (Khed Murder) चढवला.

हल्ल्याचा थरार
जीव वाचवण्यासाठी तुकाराम यांनी डावा हात पुढे केला असता, गज हातातून आरपार गेला आणि ते गंभीर जखमी झाले. हे पाहून वडील दत्तात्रय पानसरे हस्तक्षेप करण्यासाठी पुढे गेले असता, दशरथ याने त्यांच्या छातीत थेट गज घुसवला. यामुळे दत्तात्रय यांचा घटनास्थळीच गंभीर जखमेमुळे मृत्यू (Khed Murder) झाला.
प्राथमिक उपचार आणि पुढील कारवाई
जखमी तुकाराम आणि दत्तात्रय यांना तत्काळ चाकण येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, छातीत गज घुसल्याने दत्तात्रय यांचा मृत्यू (Khed Murder) झाला. तुकाराम यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी दशरथ पानसरे आणि त्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.