Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १२, शके १९४७. वार – शनिवार. तारीख – ०७.०६.२०२५ (Rashi Bhavishya 7 June 2025). शुभाशुभ विचार – वृद्धी तिथी.
आज विशेष – भागवत एकादशी.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – चित्रा ९.४० पर्यंत नंतर स्वाती. चंद्र राशी – तूळ.
मेष- (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 7 June 2025
कार्यक्षेत्रात तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल. आज एखाद्या अटीतटीच्या प्रसंगास यशस्वीपणे तोंड द्याल. व्यस्त दिवस.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
आज नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. वरिष्ठांच्या मर्जीत रहा. बिनचूक काम करूनच विरोधकांच्या कारवाया रोखता येतील.
मिथुन (शुभ रंग – केशरी)
विविध मार्गाने येणारा पैसा जाण्यासाठी ही विविध मार्ग तयार असतील. आज तुम्ही मुलांची हौस पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. आनंदी दिवस.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज कुटुंबात काही उत्साहावर्धक घटना घडतील. मुलांची अभ्यासातील प्रगती तुम्हाला समाधान देईल. आज बांधकाम व्यावसायिकांचे मोठे सौदे यशस्वी होतील.
Shekhar Singh: सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!
सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 7 June 2025
आज एखाद्या सामाजिक हिताच्या कार्यात तुम्ही हौसेने भाग घ्याल. काही घरगुती समस्या तुमच्याकडून दुर्लक्षित होतील. मुले आज अभ्यासाचा कंटाळाच करतील.
कन्या (शुभ रंग- भगवा)
राशीच्या धनस्थानी चंद्र असताना काही जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
वेळेचा सदुपयोग व पैशाचे योग्य नियोजन केल्यास आज उद्योगधंद्यात प्रगतीपथावर राहू शकाल. आज महत्त्वाच्या वाटाघाटी सामोपचाराने पार पडतील.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज अति आक्रमकतेने कोणतेही निर्णय घेऊ नका. घरातील थोरांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यांच्या वयाचा मान राखणे हिताचे राहील.
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 7 June 2025
पैशाअभावी स्थगित असलेले उपक्रम नव्याने सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जिवलग मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. छान दिवस.
मकर (शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी आज काही मनाविरुद्ध घडामोडी घडतील. नोकरदारांना वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आज सरकारी नियम मोडू नका.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
उच्चशिक्षित मंडळींना परदेश गमनाचे वेध लागतील. अध्यात्मिक मार्गावर असणारी मंडळी सत्संगात राहतील. गुरुकुल्य व्यक्तींचा सहवास लागेल.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही. आपल्या मर्यादेत रहा भिडस्तपणा पायी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज जोडीदाराला लाभ होईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424