👉 सायबर पोलिसांची कामगिरी
Team MyPuneCity – बनावट कागदपत्रे तयार करून मौजमजेसाठी वेगवेगळ्या बँकांकडून ५१ लाखांचे रुपयांचे कर्ज घेत असलेल्या एका आरोपीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट लोनसाठी तयार करण्यात ( Pimpri Crime News)आलेल्या आणखी २० फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
युवराज भरत तिवडे (रा. यशवंतनगर, स्वराज गार्डन, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील बँकेत एका व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून एकजण विविध नावाने बँकांकडून कर्ज घेत असल्याचे समोर आले. तो आपला पत्ता वेळोवेळी बदलत असून अनेक मोबाइल नंबर वापरत असल्याचेही( Pimpri Crime News) निष्पन्न झाले.
पोलिसांनी सापळा रचून मोशी टोलनाका येथे त्याला अटक केली. सुरुवातीला त्याने खोटी नावे सांगितली. मात्र सखोल तपासात त्याचे खरे नाव युवराज भरत तिवडे असल्याचे उघड झाले.
त्याने सायबर कॅफेमध्ये जाऊन संगणकावरील डेटा वापरून पॅनकार्ड नंबरच्या आधारे कस्टमर केअरशी संपर्क करून त्या पॅनकार्डवर आधार क्रमांक मिळवले. यानंतर तो त्या आधार क्रमांकाचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार करत असे. प्राप्त आधार आणि पॅनकार्डच्या आधारावर इतर बनावट कागदपत्रे तयार करून तो बँकेतून कर्ज काढत होता.
त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीच्या नावाने १८ लाख, दुसऱ्या दोन व्यक्तींच्या नावाने अनुक्रमे १८ लाख व १५ लाख रुपयांचे असे एकूण ५१ लाखांचे कर्ज घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्याच्याकडून आणखी २० व्यक्तींच्या नावाने लोनसाठी तयार करण्यात आलेल्या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, अंमलदार अतुल लोखंडे, प्रिया वसावे, हेमंत खरात, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, सुरंजन चव्हाण, स्वप्नील खणसे, विशाल निश्चित, महेश मोटकर यांच्या ( Pimpri Crime News) पथकाने केली.