Team MyPuneCity – नारायण पेठेतील नीलकंठ ज्वेलर्समधील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहार, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रतीक नगरकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचाबत नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (वय ३७, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Nigdi : ‘अलौकिक कर्तृत्वामुळे व्यक्ती लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरते!’ – प्रा. दिगंबर ढोकले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्समन होता. नगरकर याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभूषणांच्या विक्री दालनाची जबाबदारी होती.
१ एप्रिल ते २५ मे २०२५ या कालावधीत त्याने चा कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने चोरले दालनातील दागिन्यांचा अपहारल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.नगरकर याने दोन हजार २५२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (कॉइन) असा ऐकन चोरला असून, चोरलेल्या ऐवजाचे मूल्य एकूण मिळून चार कोटी ५८ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत (Pune Crime News) म्हटले आहे.