Team MyPuneCity – दारू शरीराला हानिकारक आहे हे सगळ्यांना (Alandi) माहिती आहे. पण एवढे सगळे असताना काही दारू शौकीनांना दारूचा मोह काही आवरत नाही. मग दारूसाठी समोर आलेली कोणतीच संधी ते सोडत नाहीत.
MLA Shankar Jagtap : वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम पूर्ण होण्याकरिता आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवासी व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक
अशातच आळंदी ता. हवेली देहूफाटा रस्त्यावरील वळणावर वाईन शॉपसाठी रहदारी करणाऱ्या वाहनाची दोरी तुटल्याने त्या वाहनांच्या मागील बाजूस असणारे दारूचे काही बॉक्स रस्त्यावर पडले. त्या वाहनातून पडलेल्या बॉक्स मधील काही दारूच्या बाटल्या रस्त्यावर फुटल्या. तर काही तश्याच राहिल्या होत्या. त्या रस्त्यावरील पडलेल्या बाटल्या लोक घेऊन जात असल्याचे चित्र (Alandi) पहायला भेटले.

लीगल वाईन शॉप साठी वाहतूक करताना रस्त्यावर वाहनाची दोरी तुटल्याने काही बॉक्स रस्त्यावर पडले. वाहन धारकाची संबधीत कागदपत्रे तपासण्यात आली.रस्त्यावर वाहनातून दारूच्या बाटल्यांचे बॉक्स पडल्याने काही लोकांची दारूच्या बाटल्या घेण्यासाठी धावपळ दिसली. त्या विषयी गावात (Alandi) चांगलीच चर्चा रंगली.