Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल अष्टमी, शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – ०३.०६.२०२५ (Rashi Bhavishya 3 June 2025). शुभाशुभ विचार – ९ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – २४.५९ पर्यंत पूर्वा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह.
मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 3 June 2025
तरुणांच्यात चैनी व विलास वृत्ती बळावेल. नवोदित कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. आज मौज मजा करताना कायद्याचे उल्लंघन करू नका.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात काही नव्या योजना सुरू करता येतील. मातुल घराण्याकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे अति लाड थांबवणे गरजेचे.
मिथुन (शुभ रंग – अबोली)
आज तुम्हाला कौटुंबिक स्तरावर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही जणांचे घरमालकांशी मतभेद होतील. वाहनाच्या दुरुस्ती साठी खर्च होईल.
कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या धनस्थानातील चंद्राने आवक वाढवली तरीही आज तुम्ही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाणीत गोडवा असूद्या. वादग्रस्त वक्तव्य टाळावीत.
Pune Mishap : नाना पेठेत विजेच्या धक्क्याने सात वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; सहकारी मुलगा गंभीर जखमी
सिंह ( शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 3 June 2025
घाई गर्दीत हट्टीपणाने घेतलेले निर्णय चुकणार आहेत. कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे हट्ट पुरवाल.
कन्या (शुभ रंग- लाल)
काही जणांना तातडीचे प्रवास करावे लागतील. विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विवाह जुळवणे विषयी चर्चा मात्र आज नको.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडू शकतो. शेअर मार्केट मधील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मुलांकडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. पैशाचे व वेळेचे योग्य नियोजन करून आज व्यवसायात प्रगतीपथावर राहता येईल. मुलांच्या आरोग्याला जपा.
धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 3 June 2025
व्यवसायाच्या दृष्टीने आज विरोधी ग्रहमान असताना मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. आज यथाशक्ती दानधर्म कराल. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.
मकर (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायला हवे. आज विश्वासू माणसाकडून ही विश्वासघात होऊ शकतो. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी नम्रपणे वागावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बिनचूक कामास प्राधान्य देणे गरजेचे आहे. बेरोजगारांना नोकरीसाठी कॉल्स येतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424