Team MyPuneCity – भरधाव वेगातील ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ( Pimpri Chichwad Crime News 02 June 2025) मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे रविवारी (1 जून) सकाळी घडली.
राजेश राजदुराई (28, नागापट्टीनम, तामिळनाडू) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विजय राघवान सुब्बाराज (33, कातवी, मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14/ईएम 9075) या ट्रेलरवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास विजय यांचा भाऊ राजेश हे नवलाख उंब्रे येथून दुचाकी (टीएन १२/ एबी १७५१) वरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून राजेश यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात राजेश यांचा मृत्यू झाला.
अॅटोरिक्षा चोरी प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 02 June 2025)
पार्क केलेली अॅटोरिक्षा चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना केएसबी चौकाजवळ 1 जून रोजी सकाळी उघडकीस आली.
प्रतीक कन्हैया राजपूत (नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कय्यूम हजीलाल मुजावर (28, चिंचवड) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मुजावर यांनी त्यांची रिक्षा (एमएच १४/केयु ९१७८) यशवंतनगर चौकाकडून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केएसबी चौकाजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी त्यांची रिक्षा चोरीला गेली. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. मुजावर यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरात रिक्षाचा शोध घेत प्रतीक राजपूत याला अटक करून त्याच्याकडून एक लाख ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली.