Team MyPuneCity – काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत रावजी मोहोळ (तिकोना, मावळ) यांच्या विरोधात फसवणुकीचा ( Yashwant Mohol ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःची जमीन असल्याचे सांगून इतर व्यक्तीची जमीन एका हॉटेल व्यवसायिकला विकल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील दीनदयाल गुप्ता (५३, बांगरवाडी, लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : ‘वृक्षथॉन मॅरेथॉन’द्वारे पुणे पोलिस व वनविभागाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश
सुनील गुप्ता हे हॉटेल व्यावसायिक आहेत. मावळ तालुक्यातील अजिवली येथील गट क्रमांक ५७ मधील एक हेक्टर १६ गुंठे पैकी पवना धरणाचा विव्ह असलेली ६० गुंठे जमीन विकण्याचे सांगितले. मोहोळ यांनी त्यांच्या मालकीची जमीन न दाखवता ठक्कर नावाच्या व्यक्तीची जमीन गुप्ता यांना दाखवली. गुप्ता यांना स्वतःची जमीन असल्याचे सांगून त्यांना दुसऱ्याची जमीन देऊन त्यांची फसवणूक केली.
हीच जमीन यापूर्वी नथू विष्णू केदारी (अजिवली, मावळ) यांना विकण्याचा प्रयत्न झाला होता. त्याबाबत विसार पावती देखील झाली होती. गुप्ता हे याबाबत जाब विचारण्यासाठी मोहोळ यांच्याकडे गेले असता त्यांनी गुप्ता यांना राजकीय पदाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तपास करीत (Yashwant Mohol) आहेत.