एकूण उलाढाल १० कोटी रुपये
Team MyPuneCity –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक वाढली.बटाट्याची आवक घटून दरात किंचित वाढ झाली. पालेभाज्यांची आवक घटूनही व भावात घसरण झाली. बकरी ईद आठवड्यावर आल्याने बोकड बाजारात मोठी उलाढाल झाली. राज्यभरातून बोकड खरेदी व विक्री करण्यासाठी व्यापारी व खरेदीदार आले होते. १५ हजार बोकड विक्रीसाठी आणण्यात आले होते. बोकडांना १५ हजार ते ५० हजारांचा दर मिळाला. एकूण उलाढाल १० कोटी रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने घटून भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,१०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ४५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २० क्विंटलने वाढून लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३६० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
- कांदा – एकूण आवक – २,५०० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,४०० रुपये, भाव क्रमांक २.१,००० रुपये,भाव क्रमांक ३.८०० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १.२,१०० रुपये, भाव क्रमांक २.१,७०० रुपये,भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – ३७८ क्विंटल (१,००० ते १,८०० रू.),कोबी – १९५ क्विंटल ६०० ते १,००० रू.),फ्लॉवर -८० क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), वांगी – ७० क्विंटल (३,००० ते ४,००० रु.),भेंडी – ६४ क्विंटल (४,००० ते ६,००० रु.),दोडका – ५० क्विंटल (४,००० ते ६,००० रु.),कारली – ७८ क्विंटल ( ३,००० ते ४,००० रु.),दुधीभोपळा – ७० क्विंटल (१,००० ते २,००० रु.),काकडी – ७४ ( क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),फरशी – १२ क्विंटल (७,००० ते ९,००० रु.),वालवड – २४ क्विंटल (७,००० ते ९,००० रुपये), ढोबळी मिरची – १३८ क्विंटल (५,००० ते ७,००० रु.),चवळी – ४८ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.),शेवगा – ३८ क्विंटल (४,००० ते ६,००० रु.),गाजर – १९५ क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),गवार – ५० क्विंटल (६,००० ते ८,००० ),वाटाणा – ३५ क्विंटल (९,००० ते १०,०००).
पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण १६ हजार १२० जुड्या (१,००० ते १,५०० रुपये ),कोथिंबीर – एकूण ३२ हजार ५४० जुड्या (८०० ते १,५०० रुपये,),शेपू – एकूण २ हजार ५०० जुड्या (१,००० ते १,४०० रुपये ), पालक – एकूण २ हजार ४०० जुड्या (१,००० ते १,८०० रुपये),.
जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८० जर्शी गाईपैकी ६५ गाईची विक्री झाली.(१५,००० ते ७०,००० रु.), १४० बैलांपैकी १०५ बैलांची विक्री झाली.(१०,००० ते ४०,००० रु.), १३५ म्हशीपैकी ११० म्हशींची विक्री झाली.(३०,००० ते ८०,००० रु.), ३०,००० शेळ्या – मेंढ्यापैकी २०,००० शेळ्यांची विक्री झाली. (२,००० ते १५,००० रु.),.