Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल षष्ठी, शके १९४७. वार – रविवार. तारीख – ०१.०६.२०२५ (Rashi Bhavishya 1 June 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – २१. ३७ पर्यंत आश्लेषा नंतर मघा. चंद्र राशी – कर्क २१.३७ पर्यंत नंतर सिंह.
मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 1 June 2025
वास्तु व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सज्जनांची उठ बस राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत.
वृषभ (शुभ रंग- मरून)
आज महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होणार आहे. प्रवासात झालेल्या नव्या ओळखींचे मैत्रीत रूपांतर होईल. सकारात्मकता वाढेल. आशादायी दिवस.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. प्रभावी वक्तृत्वाने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. शब्द मात्र जपून वापरा.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही कुठेही आपलेच खरे करण्याचा हट्ट चालवाल. इतरांचंही म्हणणे समजून घेणे हितच राहील. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर न घेतलेल्या बऱ्या.
सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 1 June 2025
आज जमाखर्चाचा तराजू डळमळीत होणार आहे. काही जणांना तातडीचे प्रवास घडतील. घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही सौम्य मतभेद होऊ शकतात.
कन्या (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे. पैसा अभावी रखडलेली कामे हाती घेता येतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.
तूळ (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक प्रयत्नांशिवाय दुसरा शॉर्टकट नाही. आज केवळ चर्चेत वेळ न दवडता कृतीस प्राधान्य देऊन यशाकडे यशस्वी वाटचाल होईल.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्हाला अध्यात्मिक मार्गाची गोडी वाटेल. काही नास्तिक मंडळी ही आज देवाला नवस बोलतील. संध्याकाळी एखाद्या सत्संग घडेल.
धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 1 June 2025
जे जमत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. धाडसाची कामे तर आज टाळाच. नाकासमोर चाळणे हिताचे राहील. आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
अति आक्रमकता टाळावी. अडचणीच्या प्रसंगी आज तुम्हाला जोडीदारच योग्य सल्ले देऊ शकेल. आज अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
आज खर्चाचे प्रमाण आवाक्या बाहेर जाईल. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. प्रवासात आरोग्य बिघडेल. खाण्या पिण्यावर ताबा असावा.
मीन ( शुभ रंग – तांबडा)
नोकरदार मंडळी नोकरीत बदल करण्यासाठी संधी शोधतील. गृहिणी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतील. सौंदर्य प्रशासनाचे व्यवसाय तेजीत चालतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424
पुण्यात मद्यधुंद कारचालकाने उडवल्याने बारा विद्यार्थी जखमी.पहा सीसीटीव्ही फुटेज