situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Drunk & Drive Case : मद्यधुंद चालकाच्या कारने १२ जणांना उडवलं; उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस

Published On:
Pune Drunk & Drive Case

घटना (Pune Drunk & Drive Case) सीसीटीव्हीत कैद; जखमींपैकी सहा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, आरोपी चालक अटकेत

Team MyPuneCity – पुणे शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर आज (शनिवारी) सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चारचाकी वाहनचालकाने तब्बल १२ जणांना उडवल्याची (Pune Drunk & Drive Case) गंभीर घटना घडली. या अपघातात सहा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जखमी झाले असून, या घटनेमुळे परीक्षेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांवर मोठा आघात झाला आहे.

पाहा घटनेचे सीसीटीव्ही फुटेज

या घटनेनंतर (Pune Drunk & Drive Case) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला. डॉक्टरांशी मी स्वतः बोललो असून, तुम्हाला संपूर्ण मदत केली जाईल. काळजी करू नका, असे आश्वासन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व जखमींना आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.

Chakan: पाझर तलावात बुडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू ; कडाचीवाडी येथील हृदयद्रावक घटना

दरम्यान, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, या अपघातातील (Pune Drunk & Drive Case) काही जखमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांची एक परीक्षा उद्या असून त्यामुळे त्यांच्या नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जखमींचा संपूर्ण खर्च शासनाच्या वतीने करण्यात येईल.

चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या नागरिकांना चारचाकीने जोरात धडक दिल्याने (Pune Drunk & Drive Case) हा अपघात घडला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर असलेल्या चहाच्या टपरीजवळ विद्यार्थी आणि नागरिक उभे असताना एमएच १३ ईपी ०३५४ या क्रमांकाच्या चारचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत ६ स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि ६ अन्य नागरिक असे एकूण १२ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी

अपघातानंतर जयराम शिवाजी मुळे या चालकास पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असे निष्पन्न झाले आहे. ही गाडी त्याच्या मालकीची नसून त्याच्या मित्राची असल्याचेही पुढे आले आहे. गाडीच्या मूळ मालकासही चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, आरोपीकडून सखोल तपास सुरू आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी माहिती दिली.

Follow Us On