Team MyPuneCity – घरातून सकाळी बाहेर पडलेल्या चार १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह चाकण जवळील मेदनकरवाडी व कडाचीवाडी ( ता. खेड ) हद्दीलगत असलेल्या एका पाझर तलावात मिळून आले आहेत. पाझर तलावाच्या शेजारी एक दुचाकी आणि काही कपडे दिसून आल्यानंतर ११२ क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षाला या बाबतची माहिती काही जणांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पाझर तलावात स्थानिकांची मदतीने शोध घेऊन एकापाठोपाठ एक असे चार अल्पवयीन मुलांचे मृतदेह या पाझर तलावातून बाहेर काढल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
चार अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवरून पी.के. कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ( दि. ३१ मे ) सकाळपासून ही अल्पवयीन मुले घरातून बेपत्ता होती. त्यानंतर दुपारी त्यांचे पाझर तलावात मृतदेह मिळून आले आहे. ओमकार बाबासाहेब हांगे ( वय १३ वर्ष सध्या रा. मार्तंड नगर मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. मस्साजोग. तालुका व जिल्हा बीड ) , श्लोक जगदीश मानकर ( वय १३ वर्ष सध्या रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे , मूळ रा. धनवडी, तालुका वरुड , जिल्हा अमरावती ) प्रसाद शंकर देशमुख ( वय १३ वर्ष, सध्या रा. मेदनकरवाडी, बोरजाई नगर , मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड) व नैतिक गोपाळ मोरे ( वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मार्तंड नगर, मुटकेवाडी रोड, ता. खेड, जि.पुणे, मूळ रा. झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला ) अशी बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मेदनकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

PCMC: ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
मेदनकरवाडी पासून काही अंतरावर पिके कॉलेजच्या पाठीमागील बाजूस एक पाझर तलाव आहे, या ठिकाणी हि चारही मुले एकाच दुचाकीवरून पोहण्यासाठी गेली होती. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने पाझर तलावांत पूर्णपणे पाणी भरलेले होते. त्यातच पोहत असताना हि सर्व मुले बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेचा अद्यापपर्यंत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नाही. मुले सकाळपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांचा काहीही तपास लागला नाही. दरम्यान कडाचीवाडी येथील पाझर तलावाच्या कडेला एक दुचाकी उभी असून काही मुलांचे कपडे तलावाच्या बाजूला पडलेले असल्याचा एक फोन ११२ या पोलिसांच्या क्रमांकावर आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तलावात शोध घेतला असता एकापाठोपाठ एक असे सुरुवातीला तीन मुलांचे मृतदेह मिळून आले. त्यानंतर काही वेळाने चौथ्या मुलाचा मृतदेह मिळून आला. मुलांचे मृतदेह तत्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांच्या आक्रोशाने हा संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

या मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले, त्यावेळी त्यांचा अंगावर केवळ अंडरवेअर हे अंतरवस्त्र असल्याचे दिसून आले आहे.
मृत्यू झालेल्या मुलांची कुटुंबे चाकण एमआयडीसी मध्ये नोकरी व भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत असल्याचे समजते. या हृदयद्रावक घटनेने हि चारही कुटुंबे हादरून गेली आहेत. या मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी रात्री उशिरापर्यंत चाकण ग्रामीण रुग्णालयात सुरु होती. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली आहे.
चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.