Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात ( Vaishnavi Hagavane case ) आहे.त्याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले,मागील दहा वर्षाच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
Pimpri : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक महान राज्यकर्त्या, शासक, न्यायप्रिय स्त्री – योगेश बहल
त्यामुळे तेथील अध्यक्षांना वाटत की, आपल्याच पक्षाची आणखी एक स्टँडर्ड बॉडी आहे.त्याप्रमाणे महिला आयोगाच् काम चालत असेल तर ते योग्य नाही.त्या पार्श्वभूमीवर येत्या अधिवेशनामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षासह इतर आयोगाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करतेवेळी एक नियमावली करण्यात यावी, याबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी ( Vaishnavi Hagavane case ) सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले,माजी पोलीस अधिकारी, माजी न्यायाधीश, माजी महिला अधिकारी तसेच कोणत्याही राजकीय पक्षांसोबत संबंध नसलेल्या व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली पाहिजे,तरच महिलांना न्याय मिळेल,अशी भूमिका मांडत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच नाव न घेता त्यांनी टीका ( Vaishnavi Hagavane case ) केली.
तसेच ते पुढे म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा की नाही.तो सत्ताधारी पक्षाचा प्रश्न आहे.पण मागील काही दिवसात घटना घडल्या, त्यावेळी अध्यक्षांनी भूमिका घेण्याची गरज होती.मात्र अध्यक्षांनी दुर्देवाने भूमिका घेतली नाही.पण त्यांनी पक्षाची भूमिका पहिली बघितली,मात्र एकूणच राज्यभरातील जनमत पाहिल्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वता:हून राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी ( Vaishnavi Hagavane case ) केली.