situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 31 May 2025 : मांजरीमध्ये पाच जणांकडून गोळीबाराचा प्रयत्न, एक विधीसंघर्षित ताब्यात

Published On:
Pune Crime News 31 May 2025

Team MyPuneCity – जुन्या वादातून मांजरी बुद्रुक परिसरात एका ( Pune Crime News 31 May 2025) युवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेतला असून, सचिन रेनके याला अटक करण्यात आली आहे.

एक ४० वर्षांची महिला (रा. गांजरी बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २९ मे रोजी सकाळी ८ वाजता गार्गी एंटरप्रायजेससमोर घडली. आरोपींमध्ये विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सातववाडी, हडपसर), साहिल बाबुराव जगताप (वय २०, रा. मांजरी), बसवराज विजय सुतार (वय २४, रा. मुंढवा), सचिन गंगाराम रेनके (वय ३५, रा. शिरूर) आणि एक विधीसंघर्षित मुलगा यांचा समावेश आहे.

या सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवून, बंदुकीसारखी शस्त्रे जवळ बाळगून फिर्यादीच्या मुलावर जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे करत आहेत.


वारजे येथे टेम्पोच्या धडकेत क्लिनर ठार, एक जखमी ( Pune Crime News 31 May 2025)

पुणे – बंगळूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वारजे परिसरात ३० मेच्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात टेम्पोमधील क्लिनरचा मृत्यू झाला, तर एक इसम गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम धुमाळ (वय ४१ वर्षे, रा. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यानुसार, ३० मे रोजी पहाटे सुमारे १.३० च्या सुमारास साने चौक, भुसारी कॉलनी, वारजे येथील महामार्गावर ही घटना घडली. टेम्पो चालकाने आपले वाहन अत्यंत हयगयीने, भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवले. त्यामुळे त्याचा टेम्पो फिर्यादीच्या ट्रकला पाठीमागून धडकला.

या अपघातात टेम्पोमधील क्लिनर अफाक अहमद अझाद खान (वय २९ वर्षे, रा. पिंपरीया, महापालसिंग, बहारिच, उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाला, तर शेजारी बसलेला इसम गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय ट्रकचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे करत आहेत.


शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून फुरसुंगीतील नागरिकाची १६ लाखांची फसवणूक ( Pune Crime News 31 May 2025)

पुणे – शेअर व आयपीओ ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून फुरसुंगीतील ४१ वर्षीय इसमाची तब्बल १६ लाख १४ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फुरसुंगी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी नमूद केले की, २५ फेब्रुवारी २०२५ ते ८ एप्रिल २०२५ या कालावधीत एका मोबाईल धारकाने ऑनलाइन संवादातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शेअर्स व आयपीओ ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठा नफा मिळेल असे सांगून त्यांच्याकडून विविध टप्प्यांत एकूण १६,१४,५०० रुपये घेतले. मात्र, नंतर संबंधित इसमाने पैसे परत केले नाहीत.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक राजेश खांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us On