situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 31 May 2025: सासरी छळ होत असल्याने विवाहितेची आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Published On:
Pune Crime News 10 June 202

Team MyPuneCity – फुरसुंगी येथील हरपळे आळी परिसरात एका २७ वर्षीय विवाहितेने सासरी होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरे व इतर नातेवाईकांविरोधात फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्षा राजेंद्र हरपळे (वय २७, रा. हरपळे आळी, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ११ जून २०२० ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान प्रतिक्षा सासरी नांदत असताना, तिच्यावर वारंवार पैशासाठी तगादा लावण्यात आला, तिला टोचून बोलले गेले तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. या छळामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.


ताडीवाला रोड येथे लोखंडी हत्याराने हल्ला; दोन भावांना गंभीर दुखापत

ताडीवाला रोड येथील मारुती मंदिराजवळ जुन्या वादातून एका २३ वर्षीय युवकावर आणि त्याच्या भावावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी (वय २३, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांच्यावर दि. २९ मे २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता तिघांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केले. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ पुढे आल्यानंतर त्यालाही उजव्या हातावर हल्ला करून जखमी केले.

तपास पोलीस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.


भरधाव डंपरची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

डंपरने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २९ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास सावतामाळी नंदीरा समोर, लोणीकंद – अहिल्यानगर रस्त्यावर घडली.

चंद्रभान रामप्रताप वर्मा (वय २५, मुळ रा. राजस्थान) हे दुचाकीवरून जात असताना, डंपरचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे वाहन चालवले व त्यांना जबर धडक दिली. यात वर्मा गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी डंपरचालकाविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे करत आहेत.


कोथरुडमधील बंगल्यातून चंदनाचे झाड चोरले; चार अज्ञातांविरोधात गुन्हा

कोथरुड येथील श्रीनिकेतन सोसायटीमधील एका बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० मे २०२५ रोजी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी (वय ६७, रा. कोथरुड, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार अज्ञात इसमांनी कटर मशीनच्या साहाय्याने सुमारे १०,००० रुपये किंमतीचे चंदनाचे झाड कापून नेले.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप करीत आहेत.


बसमधील गर्दीत सोन्याचे दागिने चोरीला; २.५५ लाखांचे नुकसान

सांगलीहून पुण्याकडे येणाऱ्या बसमध्ये प्रवासादरम्यान एका महिलेकडील २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. ही घटना दि. २९ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत घडली.

फिर्यादी (वय २५, रा. चव्हाण आळी, विघ्नहतों बिल्डिंग, धायरी गाव, पुणे) या सांगली जिल्ह्यातील एरनोली येथून बसने पुण्याकडे प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांची पर्स फोडून त्यामधील सोन्याचे दागिने लंपास केले.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे करत आहेत.

Follow Us On