Team MyPuneCity – मित्राच्या हळदी समारंभासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादाच्या रागातून दोन तरुणांनी दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील कामशेत येथे घडली. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात (Kamshet Crime) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sate Crime: हॉटेलच्या बिलावरून वाद; मॅनेजर व वेटरने मिळून केली ग्राहकाला मारहाण
दीपक संजय रेड्डी (वय २८, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. दत्त कॉलनी, कामशेत) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, दिनांक ३० मे रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ते आपल्या मित्र जय मोरे यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी भिमनगर, कामशेत येथे (Kamshet Crime) गेले होते.
कार्यक्रम सुरू असताना त्यांचे ओळखीचे अमित लालगुडे (पूर्ण नाव अज्ञात) व त्याच्यासोबत असलेला आदित्य (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी अचानक जुन्या वादाचा राग मनात धरून दिपक रेड्डी यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत (Kamshet Crime) केली.
या हल्ल्यात त्यांना रक्तस्त्राव व डोक्याला गंभीर इजा झाली असून, तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या प्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करत असून, आरोपींचा (Kamshet Crime) शोध सुरू आहे.