MyPuneCity – शेर ए पंजाब हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ (Sate Crime) वादातून एका ग्राहकाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मावळ तालुक्यातील मोहितेवाडी साते येथे घडली. हॉटेलचे मॅनेजर आणि दोन वेटर यांनी मिळून ही मारहाण केल्याचा आरोप असून, वडगाव मावळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मनोज बन्सी चवरे (वय ३४, व्यवसाय ड्रायव्हर, रा. दत्त मंदिराजवळ, कान्हे फाटा, ता. मावळ) यांनी दिलेल्या माहितीवरून हे प्रकरण उघड झाले आहे. दिनांक २९ मे २०२५ रोजी रात्री सुमारास ते आपल्या मित्रांसह जुना मुंबई-पुणे महामार्गालगत मोहितेवाडी साते येथील शेर ए पंजाब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर आलेले ४९० रुपयांचे बिल न भरल्यामुळे (Sate Crime) वाद झाला.
या वादातून चिडून हॉटेलचे मॅनेजर व त्यांच्यासोबतचे दोन वेटर (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी मनोज चवरे यांना प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर दमदाटी करत हाताने मारहाण केली आणि शेवटी मॅनेजरने आपल्या हातातील स्टीलच्या कड्याने त्यांच्या डोक्यात जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात मनोज चवरे यांना दुखापत झाली आहे.
या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध (Sate Crime) घेण्यात येत आहे.