Team MyPuneCity – आळंदी (ता.हवेली ) देहुफाटा सिग्नल समोरील रस्त्यावर ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्डे पडले होते. तेथील खड्ड्यामुळे दुचाकी वाहनांना (Alandi) रस्त्यावरून रहदारी करताना कसरत करावी लागत होती.

तसेच छोट्या मोठ्या वाहनांना तेथून रहदारी करताना खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊन ती खूपच संथ गतीने वाहने चालत होती. सिग्नल सुटल्यानंतर ही तेथील खड्ड्यांमुळे वाहनांना जाण्यास अडथळे निर्माण होऊन संथ गतीने चालल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर (Alandi ) होत होता.
या सर्व बाबींचा विचार करत वाहतूक पोलीस अरुण गर्जे यांनी स्किड-स्टीअर लोडर मशीनद्वारे मुरूम टाकून देहूफाटा सिग्नल समोरील काही खड्डे बुजवले.ते बुजवण्याचे कार्य चालू असतानाच प्रशासनाने ती दखल घेत तेथील खड्डे बुजवले.अरुण गर्जे यांचे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व्हिडिओ एका व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला. त्यांच्या केलेल्या त्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात (Alandi) आले.