सद्गुरूंच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करत, दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मना सद्गुरूंचे नाव, प्रतिमा आणि व्यक्तिमत्वाचा गैरवापर करणारी कन्टेन्ट काढून टाकण्याचा अंतरिम आदेश केला जारी
Team MyPuneCity – सद्गुरूंच्या नावे एआय द्वारे बनावट ऑडिओ, व्हिडिओ आणि प्रतिमा तयार करून त्यांच्या सद्भावनेचा आणि लोकप्रियतेचा वापर करून विविध उत्पादने विकण्यासाठी आणि सबस्क्रायबर मिळवण्यासाठी प्रसारित करून फसवणूक होत असल्याची तक्रार अनेक सोशल मिडिया वापरकर्त्यांनी केली(Sadhguru) होती.
याच पार्श्वभूमीवर सद्गुरू आणि ईशा फाऊंडेशन यांनी दाखल केलेला व्यक्तिमत्व हक्कांचा खटला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आला. न्यायालयाने विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मना सद्गुरूंचे नाव, प्रतिमा आणि व्यक्तिमत्वाचा गैरवापर करणारी कन्टेन्ट काढून टाकण्याचा (Sadhguru) अंतरिम आदेश जारी केला.
न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करत, फाऊंडेशनने एक्स वर पोस्ट केले, “या फसवणुकीत एआय द्वारे तयार बनावट व्हिडिओ, सद्गुरूंची अटक यासारख्या खोट्या घटनांचे रूपांतरित चित्रण आणि वित्तीय गुंतवणुकीचा प्रचार करणाऱ्या भ्रामक जाहिराती समाविष्ट आहेत. ईशा फाऊंडेशन अशी बनावट कन्टेन्ट काढून टाकण्यासाठी (Sadhguru) आणि लोकांना या फसवणुकीचे बळी पडण्यापासून रोखण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.”