situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुण्यात रविवारी वृक्षाथॉन मॅरेथॉन; वाहतुकीत मोठे बदल ;नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक विभागाने केले आवाहन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे शहर वाहतूक विभागाच्या शिवाजीनगर आणि चतु:श्रृंगी हद्दीत येत्या १ जून २०२५ रोजी ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनसाठी पहाटे ४ ते सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक नियमन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनदरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

मॅरेथॉनचा मार्ग –

ही मॅरेथॉन पुणे शहर पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथून सुरू होणार असून, तिथून डावीकडे वळून वीर चाफेकर चौक, सुर्यमुखी दत्त मंदिर चौक, कॉसमॉस युटर्न चौक, एसबी जंक्शन चौक, पुणे विद्यापीठ, पाषाण रोड, सीपीआर, अभिमानश्री, एनसीएल शाळा चौक, पंचवटी चौक, एआरडीई पाषाण, पाषाण सर्कल, एनडीए रोड, नेकलेस गार्डन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचएमईआरएल चौक, बावधन पोलीस चौकी, डी-पॅलेस चौक, शिंदे पेट्रोल पंप, चांदणी चौक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात परत येईल.

Pune: धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल- पंकजा मुंडे

वाहतूक बदल –

सदर मॅरेथॉन दरम्यान खालील वाहतूक बदल करण्यात आले आहेत:

  1. शिवाजीनगर ते चतु:श्रृंगी मार्ग बंद. पर्यायी मार्ग – सिमला चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट मार्गे इच्छित स्थळी.
  2. एफसी रोडवरून येणारी वाहतूक – संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते एकबोटे चौक, एकबोटे लेन मार्गे सिमला चौक.
  3. नर्गिस दत्त लेन मधील वाहने – मॉडेल कॉलनी रोड, ललित महल चौक, संत ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे सिमला चौक.
  4. एलआयसी लेन व सुर्यमुखी दत्त मंदिर लेन तात्पुरत्या स्वरूपात बंद.
  5. बीएम थोरात चौकाकडून कोथरूडकडे जाणारी वाहतूक – संत ज्ञानेश्वर पादुका चौक व एसबी रोडने मार्गस्थ.
  6. मॉडर्न चौक ते रेव्हन्यू कॉलनी लेन दरम्यान १०० मी. दुहेरी वाहतूक ठेवण्यात येणार.
  7. चांदणी चौकातून पाषाणकडे जाणारी वाहतूक बंद करून ती पुणे-बेंगलोर हायवेवर वळविण्यात येणार.
  8. पाषाण गावातून अभिमानश्रीकडे जाणारी वाहतूक – बालाजी चौक, पाषाण-सुस रोडमार्गे बाणेर लिंक रोडकडे वळवली जाईल.
  9. खडकी रेंजहिल्सकडून येणारी वाहतूक – सिंफनी सर्कलमार्गे खडकीकडे वळवण्यात येईल.
  10. नळस्टॉप चौकाकडून येणारी वाहतूक – जे डब्ल्यू मॅरियट चौकमार्गे दिप बंगला चौकाकडे वळवण्यात येईल.
  11. ओम सुपरमार्केट चौकाकडून गणेशखिंड रोडकडे जाणारी वाहतूक बंद.
  12. जे डब्ल्यू मॅरियट चौक ते गणेशखिंड रोड दरम्यान वाहतूक बंद.
  13. बाणेर-बालेवाडी मार्गे विद्यापीठाकडे जाणारी वाहतूक – ब्रेमेन चौक, डॉ. आंबेडकर चौक, खडकीकडे वळवण्यात येईल.
  14. पिंपरी-चिंचवडकडून औंधमार्गे विद्यापीठाकडे येणारी वाहतूक – स्पायसर रोड, आयुका गेट, डॉ. आंबेडकर चौक, खडकीकडे.

नो पार्किंग व नो हॉल्टिंग आदेश

मॅरेथॉन मार्गावर पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी “नो पार्किंग” व “नो हॉल्टिंग”चे आदेश लागू करण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन

वाहतूक पोलिसांनी मॅरेथॉन मार्गावरील चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, पोलिस व स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

हे सर्व बदल डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रभारी पोलीस उपआयुक्त (वाहतूक), पुणे शहर यांच्या अधिकृत आदेशानुसार लागू करण्यात आले आहेत.

Follow Us On