Team MyPuneCity – खडकीतील जुन्या पिढीतील डॉ. पी. एस. आगरवाल यांचे वयाचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते गरीबांचे डॉक्टर म्हणून (Khadki) प्रसिद्ध होते.
डॉ. पी. एस. आगरवाल हे आलेगावकर हायस्कूल खडकी येथील संस्थेत ते संचालक होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी वैचारिक लेखन करून ग्रंथ प्रकाशित केले .
अनेक चळवळीतून त्यांनी भाग घेतला होता. त्यांची मंथन चिंतन, आपले हे असे आहे बुवा, यमराज हसला, फकीर गुरू ही प्रसिद्ध झालेली पुस्तके आहेत. त्यांच्या मागे मुलं, मुली, जावई, नातवंड, पतवंडे असा मोठा परिवार (Khadki) आहे.