situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

General V. K. Singh: जनरल व्ही. के. सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्मृतिस्थळी वाहिली श्रद्धांजली

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील “हट ऑफ रिमेम्ब्रन्स” या पवित्र स्मृतिस्थळी आज पार पडलेल्या अत्यंत भावनिक समारंभात मिझोरमचे राज्यपाल जनरल डॉ. व्ही. के. सिंग (निवृत्त) यांनी वीर जवानांना आदरांजली अर्पण केली. १४८ व्या कोर्सच्या पासिंग आऊट परेड निमित्ताने ते रिव्ह्यूइंग ऑफिसर म्हणून उपस्थित होते.

प्रबोधिनीच्या परिसरातील हे स्मारक दुसऱ्या महायुद्धात तसेच स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लष्करी कारवायांमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, १० ते १७ व्या कोर्सच्या कैडेट्सनी श्रमदानातून हे स्मारक उभारले आहे. कालांतराने, विविध युद्ध मोहिमांमध्ये बलिदान दिलेल्या माजी प्रबोधिनी अधिकाऱ्यांची व प्रशिक्षणादरम्यान निधन पावलेल्या कैडेट्सचीही स्मृती येथे जतन करण्यात आली आहे.

Pune: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन दिमाखात संपन्न; पहिल्यांदाच १७ महिला कॅडेट्स दीक्षांत

आजच्या समारंभात जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना दिली. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व लाभले. “हट ऑफ रिमेम्ब्रन्स” हे स्थळ शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असून प्रबोधिनीतील प्रत्येक कैडेटला कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीची प्रेरणा देते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या शिस्तबद्ध आणि मूल्याधिष्ठित प्रशिक्षणाचा हा भाग नव्या पिढीतील अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रसेवेची जाणीव अधिक दृढ करतो. स्मृतिस्थळी आयोजित झालेला हा समारंभ देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांच्या स्मृतीचे जतन आणि त्यांच्या पराक्रमाचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न होता.

Follow Us On