३३६ कॅडेट्सनी घेतली भारतीय सशस्त्र दलातील भविष्यातील सेवेसाठी शपथ
Team MyPuneCity -खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (NDA) १४८ वा पदवीप्रदान समारंभ २९ मे २०२५ रोजी हबीबुल्ला हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. (डॉ.) पूनम टंडन यांची उपस्थिती लाभली होती.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग (AVSM, NM) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात एनडीएचे प्राचार्य प्रा. ओ. पी. शुक्ला यांनी २०२५ च्या स्प्रिंग टर्मचा शैक्षणिक अहवाल सादर केला.

प्रा. टंडन यांनी आपल्या भाषणात उत्तीर्ण होत असलेल्या सर्व कॅडेट्सचे अभिनंदन करताना त्यांना जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा ‘त्रिसेवा’ प्रशिक्षण संस्थेतील कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल गौरवले. त्यांनी पालकांचेही आभार मानले की, त्यांनी आपल्या पाल्यांना भारतीय सशस्त्र दलात सेवेसाठी प्रोत्साहित केले.
Chinchwad : “सावरकरांचे विचार आजही स्फूर्तीदायक” – डॉ. जितेंद्र होले
या पदवीप्रदान समारंभात एकूण ३३६ कॅडेट्स उत्तीर्ण झाले. यातील २२८ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये ८४ कॅडेट्स सायन्स शाखेतील, ८५ कॅडेट्स कॉम्प्युटर सायन्स शाखेतील आणि ५९ कॅडेट्स आर्ट्स शाखेतील होते. विशेष म्हणजे, मैत्रीपूर्ण परदेशी देशांमधून आलेल्या १७ कॅडेट्सनाही यावेळी पदवी बहाल करण्यात (NDA)आली.

तसेच, नौदल व हवाई दलातील एकूण १०८ कॅडेट्सना बी.टेक. अभ्यासक्रमाचे तीन वर्षांचे पूर्णता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कॅडेट्सना पुढील वर्षभर त्यांच्या अनुक्रमे भारतीय नौदल अकादमी (एझीमाला) आणि हवाई दल अकादमी (हैदराबाद) येथे प्री-कमिशनिंग प्रशिक्षण पूर्ण (NDA) केल्यानंतर अंतिम बी.टेक. पदवी प्रदान केली जाईल.

या समारंभाद्वारे भारतीय सशस्त्र दलातील भावी अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी सज्ज होत असलेल्या शेकडो युवा कॅडेट्सचा गौरव करण्यात आला. NDA चा हा पदवीप्रदान समारंभ केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर देशसेवेच्या व्रताला अर्पण झालेल्या तरुणाईच्या प्रेरणादायी प्रवासाचे प्रतीक (NDA) ठरला.