Team MyPuneCity – पुण्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आणि उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेत्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर त्यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहर संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे.
२४ मे २०२५ रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.या प्रसंगी शिवसेना सचिव संजयजी मोरे, शहरप्रमुख नानासाहेब भानगिरे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, कामगार नेते राजेंद्र शितोळे हे उपस्थित होते.
शिवसेना शहर संघटक पदी निवड झाल्यानंतर आनंद गोयल म्हणाले, हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा विचारांचा आणि कार्याचा वारसा मा.एकनाथ जी शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा धडका पाहून राज्यातील लाखो शिवसैनिक प्रेरित झाले आहे.त्यामुळे माझ्यासह असंख्य शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
Pimpri Chinchwad Crime News 29 May 2025: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक
तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर शहर संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे.ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडणार असून राज्य सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवित राहणार आहे.त्याच बरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे महापालिकेवर भगवा फडकविणारच असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.