Team MyPuneCity – फेसबुक वर कोणत्या ना कोणत्या बनावट (Alandi) नावाने फेसबुक खाते तयार केले जात असतात. फेसबुकवर बनावट खाती बनवण्याची आणि वापरण्याची समस्या गंभीर आहे. ही खाती अनेकदा घोटाळे, फसवणूक आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरली जातात. लोकांना बनावट खात्यांपासून सावध राहण्याचा सल्ला वारंवार समाजमाध्यमातून देण्यात येतो.
अश्यातच आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडण्यात आल्या बाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे खांडेकर यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सर्वांना सतर्क राहण्याचे (Alandi) आवाहन केले आहे.
“कोणीतरी माझ्या नावाने बनावट खाते उघडले आहे. कृपया अशा खात्यांना प्रतिसाद देऊ नका,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या बनावट खात्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर, नामांकित व्यक्तींच्या नावाने बनावट खाती उघडून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. अशा खात्यांद्वारे पैशांची मागणी किंवा इतर मार्गाने नागरिकांची फसवणूक केली जाते. यामुळे कोणतीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना खात्याची सत्यता काळजीपूर्वक तपासावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी अशा बनावट खात्यांपासून सावध राहून संशयास्पद लिंक, मेसेज किंवा मागण्यांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले (Alandi) आहे.